रिझर्व्ह बँकेची नाताळभेट! गृहकर्जदारांसाठी व्याजदर स्वस्ताईचे पर्व (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

रिझर्व्ह बँकेची नाताळभेट! गृहकर्जदारांसाठी व्याजदर स्वस्ताईचे पर्व

नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या तमाम कर्जदारांना स्वस्त व्याजदराची भेट रिझर्व्ह बँक गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी दिली. अर्थव्यवस्थेचा अनपेक्षित विकास आणि कमी होत असलेली महागाई या जोरावर मध्यवर्ती बँकेने रेपो दर पाव टक्क्याने कमी करत तो ५.२५ टक्के केला.

Swapnil S

मुंबई : नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या तमाम कर्जदारांना स्वस्त व्याजदराची भेट रिझर्व्ह बँक गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी दिली. अर्थव्यवस्थेचा अनपेक्षित विकास आणि कमी होत असलेली महागाई या जोरावर मध्यवर्ती बँकेने रेपो दर पाव टक्क्याने कमी करत तो ५.२५ टक्के केला. फेब्रुवारी २०२५ पासूनची ही चौथी व्याजदर कपात आहे.

देशात स्थिर अर्थव्यवस्थेचे (गोल्डीलॉक्स) चित्र असल्याचे निरीक्षण नोंदवित मल्होत्रा यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर सहा महिन्यांत प्रथमच प्रमुख व्याजदरात कपात करत असल्याचे घोषित केले. डॉलरच्या तुलनेत नव्वदीला पोहोचलेल्या रुपयाला मागे खेचण्यासाठी अर्थव्यवस्थेत अतिरिक्त १ लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे वचनही गव्हर्नर मल्होत्रा यांनी दिले.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढील बैठक ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षासाठीची महागाई दर आधीच्या २.६ टक्के अंदाजावरून कमी करत तो २ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे, तर विकास दरवाढीचा यापूर्वीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून वाढवत ७.३ टक्के केला आहे.

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित