महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ५ टक्क्यांवरून किंचित वाढवून ५.२ टक्के केला आहे. तसेच विविध वस्तूंमध्ये किंमतींचा ताण वाढताना दिसत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ५ टक्क्यांवरून किंचित वाढवून ५.२ टक्के केला आहे. तसेच विविध वस्तूंमध्ये किंमतींचा ताण वाढताना दिसत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, अपुरा नैऋत्य मान्सून, एल निनोची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय तेल किंमतींमधील उच्च अस्थिरता यामुळे पुरवठा बाजूने महागाईवर नजीकच्या काळात सातत्याने दबाव राहण्याची शक्यता आहे.

साखर आणि कांदा यांसारख्या काही विशिष्ट वस्तूंच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ पाहता अन्नधान्याच्या किंमतीतील वाढ आता अधिक व्यापक झाली आहे. ऑगस्टमध्ये प्रामुख्याने प्रतिकूल बेस इफेक्ट्समुळे इंधन महागाई वाढली आहे.
संजय मल्होत्रा, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक

सर्व घटकांचा विचार करून, २०२६-२७ साठीचा किरकोळ महागाई दर ५.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे; यामध्ये दुसरी तिमाही ४.९ टक्के, तिसरी तिमाही ६.० टक्के आणि चौथी तिमाही ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२७-२८ च्या पहिल्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ५.६ टक्के वर्तवण्यात आला असून त्यातील धोके संतुलित स्वरूपात आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत

२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; 'आम्ही हे करून दाखवू' - मोदींनी दिला नवा नारा

शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले

पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद