राष्ट्रीय

केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरींनी घेतला 'हा' मोठा निर्णय

वृत्तसंस्था

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे आता सक्तीचे केले आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

सायरस मिस्त्री यांचे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी रस्ते अपघातात निधन झाले. मिस्त्री हे मर्सिडिज कारच्या मागील सीटवर बसले होते. सीटबेल्ट लावला नसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे उघड झाले. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भारतातील खराब रस्त्यांबरोबरच कारमध्ये मागील सीटवर बसलेले प्रवासी सीटबेल्ट लावत नसल्याचे आढळले आहे.

या अपघातानंतर तज्ज्ञांनी सांगितले की, वाहनांच्या वेगाबरोबरच मागील सीटला बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्तीचा करावा. त्यामुळे अपघात टळू शकतील. पाठीमागील बाजूस बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्तीचा नसल्याने प्रवाशांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांना त्याचा धक्का बसतो. तसेच अपघात लवाद नियमभंग केल्याचा ठपका ठेवून संबंधितांना नुकसानभरपाईची कमी रक्कम देतात. सरकारने २०१९मध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्याचा नियम केला; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मिस्त्री यांनी २०२०पासून आतापर्यंत सात वेळा वाहतूक नियमभंग केल्याचे आढळले आहे. त्यात वेगवान कार चालवणे, सिग्नल तोडणे आदींचा समावेश आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, “मिस्त्री यांनी सात वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांच्या अपघाताच्या चौकशीत आढळून आले. या अपघाताचा सर्व बाजूने आम्ही तपास करत आहोत. आरटीओ मर्सिडिज कंपनीशी चर्चा करत आहे. आम्ही घटनास्थळी जाऊन तपास करत आहोत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल