नितेश राणे, पी. विजयन (डावीकडून) 
राष्ट्रीय

मंत्रिपदावरून नितेश राणे यांची हकालपट्टी करा; केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची मागणी

केरळबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री नितेश राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.

Swapnil S

थिरुअनंतपुरम : केरळबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री नितेश राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.

राणे यांनी केरळ हे मिनी पाकिस्तान असल्याची टीका केली होती. त्यांच्या विधानावरून राजकीय क्षेत्रात जोरदार टीका होत आहे.

केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, केरळला बदनाम करण्याचा हा डाव आहे. हा संघ परिवाराचा अजेंडा आहे. राणे यांचे वक्तव्य आक्षेपार्ह व निंदनीय आहे. याप्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करून संघ परिवार केरळच्या विरोधात अजेंडा चालवत आहे. संघाच्या या द्वेषमूलक वक्तव्याच्याविरोधात केरळच्या जनतेने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे ते म्हणाले.

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर मौन बाळगणाऱ्या केंद्र सरकारही विजयन यांनी टीका केली. जे मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात, ते पद सांभाळण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांची हकालपट्टी करावी, असे विजयन म्हणाले.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश