रिझर्व बँक RBI
राष्ट्रीय

ठेवींवरील विम्याचे पैसे बँक खातेदारांकडून घेणार; आरबीआयचे संकेत

आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत आपण ते ठेवतो. सध्या ५ लाख लाखांपर्यंतच्या रकमेला विमा संरक्षण आहे. म्हणजेच, बँक दिवाळखोरीत गेल्यास खातेदाराला ५ लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. यासाठी लागणारी विम्याच्या रकमेचा प्रीमियम संबंधित बँक भरत असते. आता या विम्याच्या रकमेच्या प्रीमियमची रक्कम खातेदारांकडून वसूल करण्याचे संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळत आहेत.

Swapnil S

मुंबई : आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत आपण ते ठेवतो. सध्या ५ लाख लाखांपर्यंतच्या रकमेला विमा संरक्षण आहे. म्हणजेच, बँक दिवाळखोरीत गेल्यास खातेदाराला ५ लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. यासाठी लागणारी विम्याच्या रकमेचा प्रीमियम संबंधित बँक भरत असते. आता या विम्याच्या रकमेच्या प्रीमियमची रक्कम खातेदारांकडून वसूल करण्याचे संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळत आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास खातेदारांवर आणखी एक बोजा पडणार आहे.

बँकेत आपले पैसे सुरक्षित राहतील या आशेने आपण तेथे पैसे ठेवत असतो. आपल्या ५ लाखांपर्यंतच्या पैशाला विमा संरक्षण आरबीआयच्या अखत्यारितील (डीआयसीजीसी) अंतर्गत दिले जाते. याचाच अर्थ बँक बुडाल्यास किंवा बंद होण्याच्या स्थितीत खातेदाराला अधिकाधिक ५ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळते. सध्या ग्राहकांना विम्याची सेवा मोफत मिळते. पण, येत्या काळात या विम्याच्या संरक्षणासाठी ग्राहकांना प्रीमियम भरावा लागू शकतो. याबाबतचे संकेत आरबीआयने दिले आहेत.

विम्याचा प्रीमियम हा वित्तीय संस्थांच्या उत्पन्न जोखमीच्या स्तराशी जोडून बँकांच्या मजबूत जोखीम व्यवस्थापनात भर घालू शकतात. यामुळे आर्थिक प्रणालीची स्थिरता वाढू शकेल. तसेच उच्च जोखीम असलेल्या संस्था विमा निधी अधिक योगदान देऊ शकतील, असे ते म्हणाले.

बँकेतील जमा रकमेवरील जोखमीशी संबंधित प्रीमियम व्यवस्था तयार करण्याची योजना आहे. कारण सध्या वित्तीय क्षेत्र हे अधिकाधिक डिजिटल होत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी अधिक सुरक्षा यंत्रणांची गरज आहे. त्यासाठी नियामक व सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणे आवश्यक ठरेल. त्यातून खातेदारांचा विश्वास कायम राहील. - स्वामीनाथन, डेप्युटी गव्हर्नर, आरबीआय

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

Mumbai: शौचालय वापराचेही प्रमाणपत्र द्यावे लागणार; इच्छुकांची धावपळ सुरू