राष्ट्रीय

रुपया सलग आठ सत्रात ४२ पैशांनी मजबूत; ११ पैशांनी वाढून ८२.९० वर

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात देशांतर्गत चलन ८३.०८ इतके कमकुवत उघडले आणि दिवसभरात ते ८२.८६ आणि ८३.१० दरम्यान व्यवहार करत होते.

Swapnil S

मुंबई : रुपया सलग आठव्या सत्रात ४२ पैशांनी मजबूत झाला आणि शुक्रवारी शेअर बाजारातील तेजीमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी वाढून ८२.९० वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि मजबूत अमेरिकन चलनात वाढ झाली झाली तरी देशांतर्गत आर्थिक आकडेवारी जाहीर होण्याच्या चिंतेने रुपयाला आणखी बळ मिळण्यापासून रोखले गेले, असे फॉरेक्स ट्रेडर्सनी सांगितले.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात देशांतर्गत चलन ८३.०८ इतके कमकुवत उघडले आणि दिवसभरात ते ८२.८६ आणि ८३.१० दरम्यान व्यवहार करत होते. दिवसअखेरीस स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेत ८२.९० वर बंद झाले. मागील बंदच्या तुलनेत रुपयात ११ पैशांची वाढ नोंदवली. देशांतर्गत चलन गुरुवारी २ पैशांनी वाढून ८३.०१ वर बंद झाले होते. गेल्या आठ व्यवहार सत्रांमध्ये, स्थानिक चलन ४२ पैशांनी मजबूत झाले असून २ जानेवारीला डॉलरच्या तुलनेत ८३.३२ वर बंद झाले होते.

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत

पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री

Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका