राष्ट्रीय

"... तर अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल"; सलमान खानला पुन्हा धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे सलमानला धमकी देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने सलमान खानला ५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केल्याने खळबळ माजली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान हा बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर आहे. ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे सलमानला धमकी देण्यात आली आहे. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले व सलमानकडे ५ कोटींची मागणी केली. या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याआधीही सलमानला धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावरही गोळीबार झाला आहे.

बिष्णोई गँग व सलमानमध्ये समझोत्यासाठी मागितली खंडणी

लॉरेन्स बिष्णोईशी असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, तो सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये समझोता घडवून आणणार आहे. त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असा इशारा दिला आहे.

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

ठाणे मेट्रो-४च्या चाचणीला प्रारंभ

मतदार केंद्रांवर एजंट नियुक्त करा; निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना पत्र

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर