संजय मल्होत्रा  
राष्ट्रीय

संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; उद्या पदभार स्वीकारणार, ३ वर्षांची मुदत

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २६ वे गव्हर्नर म्हणून महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास हे सहा वर्षांच्या सेवेनंतर मंगळवारी निवृत्त होत आहेत. संजय मल्होत्रा हे ११ डिसेंबरला गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २६ वे गव्हर्नर म्हणून महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास हे सहा वर्षांच्या सेवेनंतर मंगळवारी निवृत्त होत आहेत. संजय मल्होत्रा हे ११ डिसेंबरला गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. शक्तिकांत दास हे २०१८ रोजी गव्हर्नर बनले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली होती. त्यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली होती.

व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव

आरबीआय अडचणीत असतानाच नवीन गव्हर्नर पदभार स्वीकारत आहेत. व्याजदर कमी करायला आरबीआयवर दबाव वाढत आहे. कारण जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विकास दर ५.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आरबीआयने महागाईचा धोका लक्षात घेऊन दोन वर्षे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे खास अधिकारी

मल्होत्रा हे सुधारणावादी व भरपूर काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. राजस्थान सरकारच्या सर्व विभागात त्यांनी काम केले आहे. मल्होत्रा हे पंतप्रधान मोदी यांचे खास अधिकारी आहेत.

मल्होत्रा हे कोणत्याही कामाला हात घालण्यापूर्वी त्याबाबत भरपूर संशोधन करतात. मुख्यमंत्र्यांसोबत पूर्वी कोणतेही सादरीकरण करत असताना ते अभ्यासपूर्ण माहिती सादर करत होते. त्यामुळे त्यांचा प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकला जात होता.

नवीन गव्हर्नरांसमोर आव्हानांचा डोंगर

भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर वाढती महागाई, कमी विकास दर, व्याजदर वाढीच्या आव्हानांचा डोंगर उभा असतानाच नवीन गव्हर्नरांची नियुक्ती होत आहे. महागाई रोखण्यासाठी दास यांच्या नेतृत्वाखालील आरबीआयने गेल्या दोन वर्षांपासून व्याजदरात कपात केलेली नाही. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून आरबीआयवर व्याजदर कपातीसाठी दबाव वाढू लागला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आरबीआयवर व्याजदर कपातीचा घोशा लावला आहे. कारण वाढत्या व्याजदरामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे. व्याजदर चढे असल्याने सामान्य नागरिकांना घर, कार, वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नाही.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता