राष्ट्रीय

माझ्यावरील कारवाईमागे राजकीय षड‌्यंत्र,संजय पांडे यांचा आरोप

वृत्तसंस्था

माझ्यावरील कारवाईमागे राजकीय षड‌्यंत्र आहे, असा आरोप माजी पोलीस अधिकारी संजय पांडे यांनी केला आहे. पांडे यांनी दिल्लीतील एका न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

पांडे म्हणाले की, ‘‘मी, अनेक हायप्रोफाईल व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांची चौकशी केली आहे. मी, इमानदारीने आपले कर्तव्य बजावले आहे; मात्र राजकीय षड‌्यंत्राने माझ्याविरोधात ही कारवाई केली आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘‘हे सर्व प्रकरण २००९ ते २०१७ च्या दरम्यानचे आहे. आता त्याची चौकशी २०२२मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ हे सर्व प्रकरण राजकीय षड‌्यंत्राचा भाग आहे,’’ असेही पांडे म्हणाले. पांडे यांचे वकील आदित्य वाधवा व सिद्धार्थ सुनील यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. यात पांडे यांची कोणतीच चूक नसून राजकीय सुडातून हा खटला दाखल केल्याचे म्हटले आहे.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप