PM
राष्ट्रीय

वाळू अन् कांदयापासून सांताक्लॉज! वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाकडून नोंद

नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे भारतातही हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो

Swapnil S

मुंबई : नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण जगभरात उत्साहात  साजरा केला जातो. त्याचप्रमाणे भारतातही हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणांमध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते तसेच एकमेकांना आदरतापूर्वक गिफ्ट हे दिले जातात. या सणाचे विशेष आकर्षण म्हणजे सांताक्लॉज असते, म्हणूनच पद्मश्री पुरस्कृत सुदर्शन पटनाईक यांनी ओरिसामध्ये पुरी येथिल ब्ल्यू फ्लॅग बीच येथे सुमारे १०० फूट लांब ४० फूट रुंद आणि २० फूट उंचीचा सांताक्लॉज ८ तासांत बनवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी वाळू बरोबरच दोन टन  कांद्याचा सुद्धा वापर केला आहे.

तसेच सांताक्लॉज कडून गिफ्ट म्हणून 'ग्रीन द अर्थ' हा मेसेज सुद्धा जगाला देण्यात आला. या रेकॉर्डची दखल वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने घेतली आहे म्हणूनच पद्मश्री पुरस्कृत सुदर्शन पटनाईक आणि त्यांच्या टीमला वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर यांनी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया प्रतिभावंत अशी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ देण्याचे काम अविरतपणे करीत आहे.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ

मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीची उद्या घोषणा होणार? संजय राऊत यांच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण