अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाल्यानंतर 'राम आयेंगे' गाणं घरा घरात पोहोचल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत आहे. एकीकडे 'जय श्री राम'अशा घोषण देत भाविक अयोध्येला राम मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी राम आयेंगे गाण्यावर लोक भन्नाट डान्स करतानाही दिसत आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक महिला शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत राम आयेंगे गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शिक्षिकेला नाचनात पाहिल्यावर विद्यार्थ्यांनीही डान्स स्टेप्स फॉलो करत नाचण्याचा आनंद लुटला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @kajalasudanii नावाच्या यूजरने शेअर केला आहे. शिक्षिकेचा आणि विद्यार्थ्यांचा डान्स पाहून लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत. या व्हिडीओला ४५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने कमेटं करत म्हटलंय, मॅडम आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहजे. दुसऱ्या एकाने म्हटलं, ही भक्ती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. तर काहींनी या व्हिडीओला जय श्री राम अशा कमेंटही केल्या आहेत.