राष्ट्रीय

सुरतमध्ये सात जणांची आत्महत्या ;आर्थिक चणचणीतून उचलले टोकाचे पाऊल

ॲप लोनच्या जाळ्यात अडकलेल्या एका युवकाने पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केली होती

नवशक्ती Web Desk

सुरत : आर्थिक चणचणीतून एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. इंटिरिअर डेकोरेशन आणि फर्निचरच्या कामांचे कंत्राट घेणाऱ्या मनीष सोळंकी या तरुणाने उधारी भागवू शकत नसल्याने आपण कुटुंबासह जीवन संपवत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणी पोलीस उपायुक्त राकेश बारोट यांनी सांगितले की, ‘मनीष सोलंकी हे इंटिरियल डेकोरेशन आणि फर्निचरचं काम करत होते. सोलंकी यांच्या घरात सुसाइड नोट आणि रिकामी बाटली मिळाली आहे. या सगळ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. उधारी चुकवता न आल्याने हे पाऊल उचलत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.’

सुरतमधील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर कनुभाई सोलंकी आपली पत्नी, मुलगा मनीष, सून आणि तीन नातवंडांसह राहात होते. कनुभाई यांचा मुलगा मनीषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता, तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनीषची पत्नी रिटा, मनीषच्या १० आणि १३ वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या आणि मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथेही अशीच एक घटना घडली होती. ॲप लोनच्या जाळ्यात अडकलेल्या एका युवकाने पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केली होती. त्याने आपल्या लहान मुलांना विष देऊन संपवलं आणि नंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला

Mumbai : सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC च्या ताब्यात द्या! अंधेरी विकास समितीचा उद्या आंदोलनाचा इशारा