नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या बिलांवर १० टक्के सर्व्हिस चार्ज सक्तीने आकारल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिल्लीतील शांग्री-ला इरोसमधील 'मिश्र चाय' रेस्टॉरंटवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात नियामकाने रेस्टॉरंटला कोणताही सर्व्हिस चार्ज आपोआप, बाय डीफॉल्ट किंवा इतर कोणत्याही नावाने लावणे किंवा गोळा करणे तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व्हिस चार्जच्या वसुलीबाबत ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी ४ जुलै २०२२ रोजी जारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.