नवी दिल्ली : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोहन भागवत राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेत आहेत. जेव्हा त्यांना सत्ता हवी होती, तेव्हा ते मंदिरांबद्दल बोलत राहिले. आता सत्ता आल्यावर मंदिरे शोधू नका, असा सल्ला ते देत आहेत, असा आरोप अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.
मशिदींखाली मंदिराचा दावा करून कसे चालणार? कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारहार्य नाही, असे मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि “भूतकाळात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करावी आणि वास्तूंचे सर्वेक्षण करण्यात यावे. यापूर्वी हिंदूंवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जतन करायचे असेल तर त्यात गैर काय?” असा प्रश्न अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारला.
तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले, “मोहन भागवत यांच्या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. मोहन भागवत हे आमचे अनुशासक नाहीत, तर आम्हीच त्यांचे अनुशासक आहोत.”