२० हजार टन LPG घेऊन जहाज कांडला बंदरात दाखल (Photo-X)
राष्ट्रीय

Gujarat : २० हजार टन LPG घेऊन जहाज कांडला बंदरात दाखल

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर, २०,००० मेट्रिक टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहून नेणारे एक जहाज गुजरातमधील कांडला येथील 'दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी'च्या बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे.

Swapnil S

कांडला : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर, २०,००० मेट्रिक टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहून नेणारे एक जहाज गुजरातमधील कांडला येथील 'दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी'च्या बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे. 'एमव्ही सायमी' असे या जहाजाचे नाव असून त्यावर मार्शल आयलंड्सचा ध्वज आहे.

कतारमधून आपला प्रवास सुरू केलेले हे जहाज शनिवारी रात्री सुमारे ११.३० वाजता कांडला बंदरात पोहोचले. या जहाजाने १३ मे रोजी अत्यंत संवेदनशील मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारताचा ध्वज असलेल्या १३ जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली आहे. यामध्ये १२ एलपीजी टँकर आणि एका कच्च्या तेलाच्या टँकरचा समावेश आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने कतारच्या रास लाफान टर्मिनलकडून खरेदी केलेल्या या जहाजात अंदाजे २०,००० टन द्रवरूप प्रोपेन आणि ब्युटेन (स्वयंपाकाचा गॅस) आहे. जहाजावरील सर्व २१ परदेशी कर्मचारी सुरक्षित आहेत.

ओमानच्या आखातात अमेरिकेची नाकेबंदी आणि इराणच्या नौदलाची कडक निगराणी असताना, जहाज सुरक्षितपणे रिकामे करण्यासाठी अत्याधुनिक सामरिक हालचालींची आवश्यकता होती.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश