राष्ट्रीय

धक्कादायक! राजस्थानात महिलेची नग्नावस्थेत धिंड ; नवऱ्यासह दोघांना पोलिसांकडून अटक

प्रतापगड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

नवशक्ती Web Desk

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका आदिवाशी महिलेला मारहाण करून तिची नग्नावस्थेत परेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना शनिवारी याबाबतची माहिती मिळाली. याप्ररणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आदिवासी महिलेला तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी मारहाण करून नग्नावस्थेत तिला घेऊन गेले. पीडितेचे वर्षभरापूर्वी लग्न झालं होत. ती गावातल्याच दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती असा आरोप तिच्यावर केला आहे .

जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला. महिलेच्या पतीसह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांपासून पळ काढताना ते जखमी झाले. त्यांच्यावर प्रतापगड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

Maharashtra Election Results Live : मुंबईत शिंदे गटाला डबल धक्का! वायकरांच्या कन्येपाठोपाठ सरवणकरांच्या पुत्राचाही पराभव

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप

शाई पुसली, गोंधळ वाढला... व्हायरल व्हिडिओची राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार; कारवाईचा प्रशासनाचा इशारा