Sikkim Tunnel Tragedy : सिक्कीममध्ये दरड कोसळून १० ठार (Photo-X/@airnewsalerts)
राष्ट्रीय

Sikkim Tunnel Tragedy : सिक्कीममध्ये दरड कोसळून १० ठार

सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील समरदंग येथे जलविद्युत प्रकल्पातील बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला.

Swapnil S

गंगटोक : सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील समरदंग येथे जलविद्युत प्रकल्पातील बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला.

अजूनही या बोगद्यात २५ जण अडकले असून त्यात प्रकल्पातील अधिकारी व कामगारांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एनएचपीसीमार्फत तिस्ता जलविद्युत प्रकल्पांतर्गत (सहावा टप्पा) या बोगद्याचे काम सुरू होते.

मंगळवारी सकाळी साडेनऊपर्यंत या दरडीखालून १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा