राम मंदिर देणगी; SIT कडून चौकशी सुरू; मंदिर परिसरात पथक दाखल  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

राम मंदिर देणगी; SIT कडून चौकशी सुरू; मंदिर परिसरात पथक दाखल

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी आपल्या तपासाचा भाग म्हणून मंदिर परिसराला भेट दिली.

Swapnil S

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी आपल्या तपासाचा भाग म्हणून मंदिर परिसराला भेट दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपास पथकाचे सदस्य गेट क्रमांक ११ मधून मंदिर परिसरात दाखल झाले.

उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट'द्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राम मंदिराची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, ‘चुकीची माहिती रोखणे आणि सत्य समोर आणणे’ आवश्यक असल्याचे सांगून ट्रस्टने केलेल्या विनंतीनंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून या एसआयटीची स्थापना करण्यात आली.

या एसआयटीमध्ये लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत, आयजीपी किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांचे खंडन करण्यासाठी आणि वस्तुस्थिती शोधण्यासाठी सविस्तर चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती ट्रस्टने सरकारला केली होती.

राज्य सरकारनुसार, एसआयटी या प्रकरणाची सर्वसमावेशक चौकशी करेल आणि आपला अहवाल सरकारला सादर करेल. तत्पूर्वी सोमवारी, राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, एसआयटीच्या तपासात कोणतीही शिथिलता किंवा हलगर्जीपणा केला जाणार नाही.

‘या तपासाचे दोन पैलू आहेत. त्यात गुन्हेगारी पैलू आणि भविष्यातील सुधारणा यांचा समावेश आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टींवर योग्य काम होईल, तेव्हाच आपण भक्तांचा विश्वास जिंकू शकू,’ असे गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत तळ ठोकून असलेल्या मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

अंतर्गत लेखा परीक्षण सुरू

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले होते की, अंतर्गत लेखापरीक्षण सुरू असून अद्यापपर्यंत आरोपांना पुष्टी देणारे काहीही समोर आलेले नाही.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च