राष्ट्रीय

स्नान करताना गंगेत सहा जणांचा बुडून मृत्यू

संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते

वृत्तसंस्था

कानपूरच्या बिल्हौरमधील अरौल कोठी घाटावर गंगेत स्नान करताना सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एक तरुण आणि चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

अरौल शहरातील बरांडा गावात राहणाऱ्या संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांसह काही मुले गंगा नदीत अंघोळीसाठी गेली असता ही दुर्घटना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ ​​दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का,नुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते १० जण अंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य