PM
PM
राष्ट्रीय

...…तर काश्मीरची अवस्था गाझासारखी! फारूख अब्दुल्लांचा पंतप्रधान मोदींना इशारा

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि लष्कराच्या कारवाईबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी केंद्र सरकारला इशारा दिला. संवादातूनच समस्या सोडवता येऊ शकते, अन्यथा आपली गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी स्थिती होईल, असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी आपापसात असलेले वाद मिटवण्यासाठी संवाद साधायला हवा, असे म्हणत अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपण पाकिस्तानशी चर्चा का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपलेला नाही. पूर्वीपेक्षा त्यात जास्त वाढ झाली आहे. आज द्वेष इतका वाढलाय की, आपण एकमेकांचे शत्रू आहोत, असे मुस्लिम आणि हिंदूंना वाटते. नवाझ शरीफ पाकिस्तानात पंतप्रधान बनणार आहेत. ते चर्चेला तयार असतील, तर आपण का करू नये, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

अब्दुल्ला यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तानविषयीच्या भूमिकेचा आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या एका वक्तव्याचा उल्लेख करत मोदी यांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. फारूख अब्दुल्ला म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमधले वाद हे चर्चेतूनच मिटतील, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. वाजपेयी म्हणायचे, ‘आपण मित्र बदलू शकतो. परंतु, आपल्याला आपला शेजारी बदलता येत नाही.’ शेजाऱ्यांशी मैत्री ठेवली तर दोघांचीही प्रगती होईल. हे शत्रूत्व कायम राहिले तर दोघेही मागे पडू. मागे एकदा नरेंद्र मोदी म्हणाले होते, युद्ध हा आता पर्याय असू शकत नाही. आम्ही चर्चा करून प्रश्न मार्गी लावू. परंतु, आपण पाकिस्तानशी चर्चा करतोय का? मला दोन्ही देशांमध्ये चर्चा होताना दिसत नाही.”

आपण चर्चेतून प्रश्न सोडवले नाहीत तर आमचीसुद्धा गाझातल्या लोकांसारखी स्थिती होईल. काश्मीरची अवस्था गाझा किंवा पॅलेस्टाईनसारखी होईल. इस्रायल सातत्याने गाझावर बॉम्बवर्षाव करत आहे, आपल्याकडेही तेच होईल, असेही त्यांनी सांगितले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, पडित नेहरूंच्या चुकांमुळे काश्मीर आपल्या हातून निसटले. काश्मीर युद्धावेळी भारतीय सैन्य जिंकत होते, पण पंजाबचा भाग येताच जवाहरलाल नेहरू यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. तो भाग आपल्याला परत कधीच मिळाला नाही. त्यावर अब्दुल्ला म्हणाले, “हे असत्य आहे. तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी देहरादून येथून लिहिलेले एक पत्र पाहा. पटेल तेव्हा आजारी होते. त्यांनी गोपाल स्वामी अयंगार यांच्यासाह काही लोकांना एक पत्र लिहिले होतं. त्यात पटेल यांनी म्हटले होते की, जास्त काळ इथे टिकण्यासाठी आमच्याकडे संसाधने नाहीत. त्यामुळे आम्ही फार काळ ही लढाई चालू ठेवू शकत नाही. यासाठी आपण जवाहरलाल नेहरूंना जबाबदार ठरवू शकत नाही.”

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व