देशभरातून मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत निरोप प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

देशभरातून मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत निरोप

संपूर्ण देशभरात दुष्काळाचे सावट असतानाच, आता १० ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मान्सून संपूर्ण देशातून माघारी जाईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात दुष्काळाचे सावट असतानाच, आता १० ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मान्सून संपूर्ण देशातून माघारी जाईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन दिवसांत राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील उर्वरित भागांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागांतून मान्सून परतू लागेल. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतूनही तो परतण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पावसाचे चारही महिने कोरडेच गेले असून दीड महिने राज्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे.

हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभे राहिले आहे. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट १८ टक्के आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत परतीचा मान्सून येण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

Pune : ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

'त्या' पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव

Mumbai : फ्री प्रेस मार्गावर दुसऱ्या दिवशीही कारवाई; पालिका पथकाने १५ हून अधिक फेरीवाल्यांना हटवले

पार्थ पवार आरोपी का नाहीत? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल