श्रीनगर : लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर हाशीम मुसाचा खात्मा  (Photo-X)
राष्ट्रीय

श्रीनगर : लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर हाशीम मुसाचा खात्मा

बडगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला प्रतिबंधित लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर हाशीम मुसा हा पाकिस्तान लष्कराच्या विशेष सेवेचा माजी हवालदार असल्याचे उघडकीस आले आहे.

Swapnil S

श्रीनगर : बडगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला प्रतिबंधित लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर हाशीम मुसा हा पाकिस्तान लष्कराच्या विशेष सेवेचा माजी हवालदार असल्याचे उघडकीस आले आहे.

हा दहशतवादी एकेकाळी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या सुरक्षा रक्षक पथकातही समाविष्ट होता. याशिवाय, एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील बैसारन भागात झालेल्या भीषण हल्ल्यात (ज्यात २६ जण ठार झाले होते) आशिफ हा मुख्य सूत्रधारांपैकी एक मानला जात होता.

बुडगाममधील कोरग, युसमर्ग येथील उच्च पर्वतीय भागात मंगळवारी रात्री उशिरा लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेत मोहम्मद आशिफ ऊर्फ हाशिम मुसा याला कंठस्नान घालण्यात आले.

गेल्या काही वर्षांत लष्करी जवान आणि नागरिकांवर झालेल्या अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांमध्ये हा पाकिस्तानी दहशतवादी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाईचा भडका! MSRDC कडून ‘टोलवाढ’; मुंबईत भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तू महागणार

निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी मोर्चे; इंडिया आघाडीची ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगावर धडक

दोन हजार गावे, वाड्या तहानलेल्या; राज्यात परतीच्या पावसानेही केली घोर निराशा, १० जिल्ह्यांमध्ये ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त घोषणापत्र हटवले; SIR झालेल्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Mumbai : फ्री प्रेस जर्नल मार्गाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा चहा टपरी, वडापावच्या दुकानांवर कारवाई