महिंद्रा थार स्टंट FPJ
राष्ट्रीय

Video : धावत्या थारच्या छतावर उभं राहून केला स्टंट, पोलिसांनी तरूणाला शिकवला चांगलाच धडा

दोन धावत्या महिंद्रा कारच्या छतावर उभे राहून धोकादायक स्टंट करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी नेमकं काय केलं? पाहा

Suraj Sakunde

अलीकडच्या काळात रिल्स किंवा शॉर्ट्स लोकप्रिय आहेत. बरेच लोक आता Instagram आणि YouTube Reels वर व्हिडिओ बनवण्यास प्राधान्य देत आहेत. रिल्स पाहणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतशी व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

असं असलं तरी आपले व्हिडिओ लोकप्रिय व्हावेत, यासाठी अनेक जण धोकादायक मार्गांचा वापर करतात. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. असाच धोकादायक स्टंट करणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. दोन धावत्या महिंद्रा कारच्या छतावर उभे राहून धोकादायक स्टंट केल्याबद्दल आणि त्याचा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली.

ismailchoudhary0041 या इन्स्टा आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तरुणानं हा व्हिडिओ पोस्ट करताच तो व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं संबंधित तरुणाला अटक केली. दोन समांतर चालणाऱ्या महिंद्रा थारच्या छतावर उभं राहून हा तरुण स्टंट करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा स्टंट अतिशय धोकादायक असून छोटीशा चूकीमुळं मोठी दुर्घटना घडू शकली असती. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणानं हा व्हिडिओ राजस्थानच्या एका राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यामध्ये शूट केला आहे.

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी–राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर

Thane : ...तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार; NCP अजित पवार गटाचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात; नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब; अटकेची टांगती तलवार