उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मोदी, शहांची भेट Photo : X (sunetra pawar)
राष्ट्रीय

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मोदी, शहांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी आणि शहा यांच्यासोबतची ही त्यांची पहिलीच भेट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी आणि शहा यांच्यासोबतची ही त्यांची पहिलीच भेट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते.

सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काल, मंगळवारी त्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन सुरुवातीला अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार उपस्थित होते.

शहा यांनी केले ‘ट्विट’

दरम्यान, या भेटीनंतर अमित शहा यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमात ट्विट केले आहे. आपल्या सर्वांचे प्रिय स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे सोपे नाही. परंतु त्यांच्या लोककल्याण आणि विकासाच्या दृष्टीला साकार करणे हे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे, असे शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोचिंग क्लासेसना चाप! प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध; इंटिग्रेटेड कोचिंगसह १३ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास बंदी; साप्ताहिक सुट्टीची सक्ती

Mumbai : मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर; पालिकेसमोर आंदोलनाचा आदित्य ठाकरेंचा इशारा

नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा

डॉग स्क्वॉडमधील सेवेनंतरही कुत्र्यांची जबाबदारी पोलिसांची; निवृत्त श्वानांना मिळणार पोलीस दलातच निवारा

'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक