नवी दिल्ली: टाटा समूहाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नोएल टाटा हे व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी सुनील डिसोझा हे व्होल्टासच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल टाटा यांची अध्यक्ष आणि संचालकपदावरून ११ नोव्हेंबर रोजी - कामकाज संपल्यानंतर निवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यानंतर १२ नोव्हेंबरपासून ते कंपनीचे मानद् अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.
दरम्यान, संचालक मंडळाने सुनील अलारिक डिसोझा यांची १२ नोव्हेंबरपासून नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. डिसोझा हे सध्या कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत.