जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य 
राष्ट्रीय

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

बिहारमधील एका भ्रष्टाचार प्रकरणात आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चलनी नोटा उंदरांनी नष्ट केल्याचे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बिहारमधील एका भ्रष्टाचार प्रकरणात आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चलनी नोटा उंदरांनी नष्ट केल्याचे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने यावर चिंता व्यक्त केली. जप्त केलेल्या नोटा सुरक्षित ठिकाणी न ठेवल्यामुळे अशा प्रकारे किती नोटा नष्ट होत असतील, असा प्रश्न विचारत न्यायालयाने याला राज्याचे "मोठे महसूल नुकसान," असे मत व्यक्त केले.

एका महिलेने तिला भ्रष्टाचार प्रकरणात सुनावण्यात आलेल्या चार वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१४ मध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना, या महिलेने तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप होता.

सर्वोच्च न्यायालयाने या महिलेला जामीन मंजूर केला असून पाटणा उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा स्थगित केली आहे.

या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या नोटा उंदरांनी कुरतडून नष्ट केल्या असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. जप्त मुद्देमाल ठेवण्याची जागा खराब असल्याने असे घडल्याचे न्यायालयाने नोंदवले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या २४ एप्रिलच्या निकालपत्रात आश्चर्य व्यक्त केले.

या प्रकरणाची मुख्य सुनावणी सुरू होईल तेव्हा न्यायालय या विषयावर सविस्तर विचार करणार आहे. विशेष म्हणजे, कनिष्ठ न्यायालयाने या महिलेला सर्व आरोपांतून मुक्त केले होते, मात्र त्यानंतर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते.

न्यायालय म्हणाले...

"चलन नोटा उंदरांनी नष्ट केल्या हे ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. सुरक्षित ठिकाणी न ठेवल्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या किती नोटांचे नुकसान होत असेल? हे राज्याचे मोठे महसूल नुकसान .", असे सर्वोच्च न्यायालयाने यात म्हटले आहे. तसेच नोटांच्या आहे.", नासाडीबाबत देण्यात आलेले स्पष्टीकरण विश्वासार्ह वाटत नसल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता