‘लिव्ह-इन पार्टनर’वर ४९८ ए लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय 
राष्ट्रीय

‘लिव्ह-इन पार्टनर’वर ४९८ ए लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८एची व्याप्ती वाढवत, पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाविरुद्धच्या कायद्यात आता 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मधील महिलांचाही समावेश होईल, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८एची व्याप्ती वाढवत, पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाविरुद्धच्या कायद्यात आता 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मधील महिलांचाही समावेश होईल, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिला आहे.

न्या. संजय करोल आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, जर लिव्ह-इन नाते 'वैवाहिक स्वरूपाचे' असेल, तर पुरुषावर महिलेचा छळ केल्याप्रकरणी कलम ४९८ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून खटला चालवला जाऊ शकतो.

लगेच अटक नाही

अटकेविरोधातील संरक्षणाचे नियम कठोरपणे लागू केले जातील, असेही न्यायालयाने नमूद केले. वैवाहिक स्वरूपाच्या लिव्ह-इन संबंधात छळाचा आरोप असलेल्या कोणत्याही पुरुषाला किंवा त्याच्या नातेवाईकांना योग्य प्राथमिक चौकशीशिवाय थेट अटक केली जाणार नाही.

जे लिव्ह-इन संबंध 'वैवाहिक स्वरूपाचे' आहेत आणि ज्यांचा पाया परस्पर विवाहाच्या उद्देशाशी जोडलेला आहे, अशा संबंधांना कलम ४९८ए चे संरक्षण लागू होईल. हे संरक्षण केवळ दोन संमतीधारक प्रौढ व्यक्तींमधील संबंधांनाच लागू असेल. खंडपीठाने स्पष्ट केले की, ही कायदेशीर व्याख्या केवळ आयपीसीच्या कलम ४९८ए पुरतीच मर्यादित असेल आणि या विस्तारित अर्थामुळे इतर कोणत्याही कायदेशीर तरतुदींवर परिणाम होणार नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

कर्करोगाची १३७ औषधे झाली स्वस्त; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती तीव्र नाराजी, २७००रु. चे औषध २७००० ला मिळणे हे नरसंहारासारखेच...

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

इमिग्रेशन धोरण होते कठोर, ट्रम्प यांनी दिली कबुली; 'डेमोक्रॅटिक 'समवेत काम करण्याची दर्शवली तयारी