राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयातील माहिती आता राष्ट्रीय डेटा ग्रीडवर यामुळे अधिक पारदर्शकता येईल -पंतप्रधान

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आता नॅशनल ज्युडिशिअल डेटा ग्रीडवर उपलब्ध आहे, अशी घोषणा भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी केली. याचा अर्थ आता जनता प्रलंबित प्रकरणांची ताजी आणि खरी माहिती ऑनलार्इन मिळवू शकणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घोषणेचे कौतुक करताना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशातील न्यायदानाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणता येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे देशातील न्यायदान प्रक्रिया मजबूत होणार, असेही पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे. तत्पूर्वी गुरुवारी दिवसभराच्या न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करताना सरन्यायाधीश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची माहिती आता तत्काळ एनजेडीजीवर अपलोड केली जाणार आहे. म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

एनजेडीजी हे एनआयसीने विकसित केलेले अद्वितीय व्यासपीठ आहे. आता एक क्लीक करून आपण प्रलंबित खटल्यांची सालागणिक माहिती, एकूण नोंदणीकृत व अनोंदणीकृत प्रलंबित खटले आणि कोरमनिहाय निवाडा झालेल्या खटल्यांची माहिती एक क्षणात मिळू शकणार आहे. सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे ‘ओपन डेटा पॉलिसी’ अंतर्गत सर्व माहिती एनजेडीजीवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच सर्व माहिती ठरावीक काळानंतर अद्ययावत करण्यात येणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त