राष्ट्रीय

न्या. आराध्ये, न्या. पंचोली यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती; केंद्राकडून हिरवा कंदील

बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये आणि पाटणा हायकोर्टाचे मुख्य न्या. विपुल मनुभाई पांचोली यांची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली: बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये आणि पाटणा हायकोर्टाचे मुख्य न्या. विपुल मनुभाई पांचोली यांची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले.

सुप्रीम कोर्ट न्यायवृंदाने त्यांच्या नावाची सोमवारी शिफारस केली होती आणि केंद्राच्या कायदा मंत्रालयाने त्यांची नियुक्ती बुधवारी जाहीर केली.

दोघांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धरून ३४ न्यायमूर्तीची पूर्ण मंजूर संख्या कार्यरत होईल.

न्या. पांचोली हे २ ऑक्टोबर २०३१ रोजी न्या. जयमाला बागची यांच्या सेवानिवृत्तीनंतर सरन्यायाधीश पदाच्या रांगेत असतील. ते ३ ऑक्टोबर २०३१ रोजी सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि २७ मे २०३३ रोजी निवृत्त होतील.

१३ एप्रिल १९६४ रोजी जन्मलेले न्या. अराध्ये यांची २९ डिसेंबर २००९ रोजी मध्यप्रदेश हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती आणि १५ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

त्यानंतर हायकोर्टात त्यांची बदली झाली. जम्मू-काश्मीर ११ मे २०१८ रोजी त्यांची जम्मू-काश्मीर हायकोर्टाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांची बदली कर्नाटक हायकोर्टात झाली आणि १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. ३ जुलै २०२२ रोजी त्यांनी कर्नाटक हायकोर्टाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यभार स्वीकारला आणि १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ते या पदावर होते. १९ जुलै २०२३ रोजी त्यांची तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि २३ जुलै २०३ रोजी त्यांनी शपथ घेतली. यानंतर २१ जानेवारी २०२४ रोजी ते बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. १९८८ रोजी त्यांनी वकिली

व्यवसायात प्रवेश केला आणि मध्यप्रदेश हायकोर्टात नागरी, घटनात्मक, मध्यस्थीकरण व कंपनीविषयक प्रकरणे हाताळली. एप्रिल २००७ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

पांचोली यांची १ ऑक्टोबर २०१४ अहमदाबाद येथे जन्मलेले न्या. हायकोर्टाचे रोजी गुजरात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि १० जून २०१६ रोजी कायम न्यायमूर्ती झाले. ते पाटणा हायकोर्टात बदली झाले आणि २४ जुलै २०२३ रोजी न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सप्टेंबर १९९१ मध्ये त्यांनी वकिली व्यवसायात प्रवेश केला आणि गुजरात हायकोर्टात वकिली सुरू केली.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई