नवी दिल्ली : दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान राजकीय नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या आरोपांवरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला १० दिवसांत सर्वंकष उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. काही याचिकांवरच प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्देश दिला. सरकारच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांना एक आठवड्यात प्रत्युत्तर दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
शांततेने जमलेल्या नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑक्टोबर रोजी म्हटले होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या अटींच्या अधीन राहून दिल्ली मेट्रो सुरळीत सुरू ठेवण्याचे आणि इंटरनेट सेवा खंडित न करण्याचे निर्देशही दिले होते.