राज्य सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राज्य सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे

एका खून प्रकरणाच्या खटल्यातील अत्यंत संथ गतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Swapnil S

नवी दिल्ली : एका खून प्रकरणाच्या खटल्यातील अत्यंत संथ गतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकार आरोपींच्या जामीन अर्जांना नेहमीच विरोध करते, परंतु फौजदारी खटल्यांचे कामकाज जलद गतीने चालवण्यास अपयशी ठरते, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्या. शील नागू यांच्या खंडपीठाने केल्विन चिंदोजी ओकोरो या परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. ओकोरो हा २०२२ मधील एका अपहरण, खून आणि दंगलीच्या प्रकरणातील आरोपी आहे.

केवळ २ साक्षीदारांची तपासणी

या टप्प्यावर आरोपीला जामीन देण्यास खंडपीठाने नकार दिला असला, तरी आरोपी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कालावधीत एकूण ४५ फिर्यादी साक्षीदारांपैकी केवळ दोनच साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. ओकोरो याला ७ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त; पारा ३८ अंशांवर, मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Mumbai : कमी कालावधीच्या सिग्नलमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई