संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

द्रुतगती महामार्ग हे मृत्यूचे सापळे बनू नयेत; सर्वोच्च न्यायालयाचे देशभरासाठी महत्त्वपूर्ण निर्देश

महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग हे प्रशासकीय दिरंगाई किंवा पायाभूत सुविधांमधील त्रुटींमुळे 'मृत्यूचे कॉरिडॉर' बनू नयेत, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण 'पॅन-इंडिया' (देशव्यापी) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर अवजड वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग हे प्रशासकीय दिरंगाई किंवा पायाभूत सुविधांमधील त्रुटींमुळे 'मृत्यूचे कॉरिडॉर' बनू नयेत, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण 'पॅन-इंडिया' (देशव्यापी) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर अवजड वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्या. जे.के. माहेश्वरी आणि न्या. ए.एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार 'जगण्याचा अधिकार' हा केवळ जीव न घेण्याची हमी नाही, तर मानवी जीवन सुरक्षित राहील असे वातावरण निर्माण करणे ही राज्याची सकारात्मक जबाबदारी आहे. बेकायदेशीर पार्किंग किंवा ब्लॅकस्पॉट्स (अपघात प्रवण क्षेत्र) सारख्या टाळता येण्याजोग्या कारणांमुळे एकाही व्यक्तीचा जीव जाणे, हे राज्याच्या संरक्षक छत्राचे अपयश आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर किंवा पदपथावर कोणत्याही अवजड किंवा व्यावसायिक वाहनाला थांबण्यास किंवा पार्किंग करण्यास मनाई असेल. केवळ नियुक्त केलेल्या 'वे-साइड अ‍ॅमेनिटीज' किंवा पार्किंग झोनमध्येच वाहने उभी करता येतील. महामार्गाच्या 'राइट ऑफ वे' क्षेत्रात नवीन ढाबे, उपहारगृहे किंवा व्यावसायिक बांधकामे करण्यास तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ६० दिवसांत अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती हटवावीत.

अंमलबजावणीची मुदत

न्यायालयाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून माहिती संकलित करून ७५ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोणतीही आर्थिक किंवा प्रशासकीय अडचण मानवी जीवनाच्या मूल्यापेक्षा मोठी असू शकत नाही, असे बजावत न्यायालयाने प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा