राष्ट्रीय

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

जर पती-पत्नी गुप्तपणे एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करत असतील तर हे नाते तुटल्याचेच द्योतक आहे...

Swapnil S

नवी दिल्ली : जर पती-पत्नी गुप्तपणे एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करत असतील तर हे नाते तुटल्याचेच द्योतक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आणि पती-पत्नीने गुप्तपणे रेकॉर्ड केलेला कॉल आता पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निकाल एका घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी दिला. पतीने पत्नीचे कॉल गुप्तपणे रेकॉर्ड केले होते, सदर पुरावा सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.

जोडीदाराने गुप्तपणे रेकॉर्ड केलेला फोन हा गोपनियतेच्या मूलभूत अधिकाराचे हनन असल्याचे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असता सर्वोच्च न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरला. जर पती-पत्नी गुप्तपणे एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करत असतील तर हे नाते तुटल्याचेच द्योतक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

तत्पूर्वी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाने संबंधित पुरावा ग्राह्य धरण्यास नकार दिला. पत्नीचे फोन कॉल गुप्तपणे रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास