कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय

महिलांवरील अत्याचार करणाऱ्या समाजकंटक आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याची आणि पोलिसांची भीती निर्माण करण्याची गरज आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली असून, काही ठरावीक भाग तर अतिशय असुरक्षित बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महिलांवरील गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचार करणाऱ्या समाजकंटक आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याची आणि पोलिसांची भीती निर्माण करण्याची गरज आहे. दिल्ली-एनसीआर परिसरातील महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली असून, काही ठरावीक भाग तर अतिशय असुरक्षित बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महिलांवरील गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले आहे.

दिल्ली-एनसीआरमधील अलीकडील बलात्काराच्या घटनांच्या संदर्भातील एका स्वतःहून दाखल करून घेतलेल्या (सुमोटो) जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे

खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले, आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल. रात्री ११ वाजताही रस्त्यावरून किंवा मेट्रोने प्रवास करताना दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे, याची खात्री आपण केलीच पाहिजे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Pune : साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध, लग्नालाही घरच्यांचा होकार; तरीही संशयावरून वाद, प्रियकराने आयटी इंजिनिअर प्रेयसीला संपवलं

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली