FPJ
राष्ट्रीय

Tahawwur Rana extradition : तहव्वुर राणाला अखेर भारतात आणलं, विमानतळावरच NIA ने ताब्यात घेतलं

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अखेर गुरुवारी दुपारी भारतात आणण्यात आले आहे.

Krantee V. Kale

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अखेर गुरुवारी दुपारी भारतात आणण्यात आले आहे. ‘एनआयए’ आणि रॉच्या संयुक्त पथक विशेष विमानाद्वारे राणाला घेऊन दिल्लीतील पालम विमानतळावर सुमारे २.३० वाजता उतरले. संयुक्त पथक बुधवारी राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेत गेले होते.

६४ वर्षाच्या राणाला दिल्लीत तिहार तुरुंगात ठेवले जाण्याची शक्यता असून, त्याला लगेचच राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर राणाला दिल्ली न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. राणाला सुरूवातीला चौकशीसाठी एनआयएच्या कोठडीत ठेवले जाईल असे समजते. एनआयएने अलीकडेच त्याचा खटला मुंबईहून दिल्लीला हस्तांतरित करण्याचा न्यायालयाचा आदेश देखील मिळवला आहे. त्यामुळे मुंबईतील ऑर्थर रोड जेलसह दिल्लीतील तिहार तुरूंग देखील राणासाठी सज्ज असल्याचे समजते.

प्रत्यार्पणाला रोखण्यासाठीची याचिका सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. पार्किन्सनचा आजार असल्यामुळे आपल्याला भारतात नेले जाऊ नये, यासाठी तहव्वूरने याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता अखेर राणाला भारतात आणण्यात आले आहे.

मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली

राणा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी मानला जातो. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली होती. राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता. राणानेच ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे हा हल्ला करण्यात आला होता. राणा आणि हेडलीने दहशतवादी कट रचला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. राणाला अमेरिकेत ‘लष्कर-ए-तोयबा’ला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या