एक्स (@annamalai_k)
राष्ट्रीय

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय; राज्याच्या अर्थसंकल्पामधून रुपयाचं चिन्हच बदललं

तामिळनाडूच्या सरकारने उद्या सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाआधी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या सरकारने राज्याच्या २०२५-२६ अर्थसंकल्पाच्या लोगोमधून रुपयाचं चिन्ह (₹) हटवलंय.

Krantee V. Kale

तामिळनाडूच्या सरकारने शुक्रवारी अर्थात १४ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाआधी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या सरकारने राज्याच्या २०२५-२६ अर्थसंकल्पाच्या लोगोमधून रुपयाचं चिन्ह (₹) हटवलंय. त्याऐवजी आता तमिळ भाषेतील चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन लोगो शेअर केला आहे. यामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्हाचा (ரூ) वापर केल्याचं स्पष्ट दिसतंय.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (NEP) असलेला प्रखर विरोध दाखवण्यासाठी तामिळनाडू सरकारने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. तामिळनाडू सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील मोठा संकेत मानला जात आहे. एनईपी आणि तीन भाषांच्या सूत्राला तमिळनाडू सरकारचा विरोध आहे. हे धोरण राज्याच्या भाषा, संस्कृती आणि शिक्षण व्यवस्थेसाठी घातक असल्याचे राज्य सरकारचे मत आहे. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, लोगोमध्ये केलेला बदल फक्त राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदावर आहे, चलनावर नाही.

तामिळ भाषेला प्राधान्य देणे हा आमचा उद्देश

डीएमके नेते एस अन्नादुराई यांनी तामिळनाडू सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले, "आम्ही रुपयासाठी तामिळ शब्दाचा वापर केला आहे. हा कोणताही संघर्ष नाही आणि तो बेकायदेशीरही नाही. तामिळ भाषेला प्राधान्य देणे हा आमचा उद्देश आहे, आणि म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे." पुढे बोलताना त्यांनी, “मी त्यांना तमिळचा योग्य प्रचार करण्यास सांगितले. तामिळनाडू शिक्षण क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. इथून लोक उत्तर भारतात स्थलांतरित होत नाहीत, तर ते अमेरिका आणि ब्रिटनमध्ये जात आहेत. हे भाजपच्या पचनी पडणार नाही, असेही ते म्हणाले. "तामिळनाडूतील कोणीतरी हे डिझाइन केले आहे, याचा देशाने अभिमान बाळगायला हवा. हे कोणी डिझाइन केले किंवा नाही यापेक्षा हे तामिळच्या प्रचारासाठी आहे. कोणताही कायदा आम्हाला हे वापरण्यापासून रोखत नाही," असे देखील अन्नादुराई यांनी सांगितले.

भाजपची रुपया चिन्ह बदलण्यावर टीका

रुपया चिन्ह बदलण्याच्या निर्णयावर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी या निर्णयावर टीका करत, "हा स्टॅलिन यांचा दिशाभूल करणारा निर्णय असून, डीएमके भाषेच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप केला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही यावरुन टीकास्त्र सोडले आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती