उदयनिधी स्टॅलिन फेसबुक
राष्ट्रीय

वडील मुख्यमंत्री, मुलगा उपमुख्यमंत्री! उदयनिधी स्टॅलिन बनले तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे रविवारी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे रविवारी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तसेच स्टॅलिन मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात आले असून, वी. सेंथिल बालाजी, आर. राजेंद्रन, डॉ. गोवी चेझियान आणि एस. एम. नासर यांना स्टॅलिन सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले आहे.

रविवारी राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल आर. एन. रवी यांनी सेंथिल बालाजी यांच्यासोबत चार द्रमुक नेत्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उदयनिधी हे पूर्वीच मंत्री असल्याने त्यांनी शपथ घेतली नाही.

तामिळनाडूत हे दुसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा वडील मुख्यमंत्री व मुलगा उपमुख्यमंत्री आहे. २००९ ते २०११ या काळात एम. के. स्टॅलिन उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे वडील एम. करुणानिधी हे मुख्यमंत्री होते.

उदयनिधी यांना युवा कल्याण, क्रीडा विकासासोबतच योजना व विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष व सरकारचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून उदयनिधी यांना पुढे आणले जात आहे.

WhatsApp Update : व्हॉट्सॲप युजर्ससाठी गुड न्यूज! आता एका ग्रुपमध्ये तब्बल १,५०० जणांना करता येणार अ‍ॅड, वाचा सविस्तर

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

Samantha Ruth Prabhu : समांथा-राजच्या घरी हलला पाळणा; बाळाचा पहिला फोटो पोस्ट करत नावही केलं जाहीर

Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

Mira-Bhayandar : १९९७ पासूनच्या बांधकाम परवानगीची चौकशी; करारांच्या दस्तांची तपासणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश