तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ; जयललितांचे विश्वासू, माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा द्रमुकमध्ये प्रवेश Photo : X
राष्ट्रीय

तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ; जयललितांचे विश्वासू, माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा द्रमुकमध्ये प्रवेश

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू आणि तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी सत्तारूढ द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. पनीरसेल्वम यांची काही दिवसांपूर्वी अभाअद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे विश्वासू आणि तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी सत्तारूढ द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. पनीरसेल्वम यांची काही दिवसांपूर्वी अभाअद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम आणि के. पलानीसामी यांच्यात अभाअद्रमुकच्या नेतृत्वारून दीर्घकाळ संघर्ष झाला होता. त्यानंतर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता पनीरसेल्वम यांनी अभाअद्रमुकचा प्रमुखविरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पनीरसेल्वम यांचे पक्षात स्वागत केले आहे.

पनीरसेल्वम यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केल्याने त्याचा परिणाम दक्षिण तामिळनाडूतील मतदारांवर होऊ शकतो, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. दक्षिण तामिळनाडूतील थेवर समाजामध्ये पनीरसेल्वम यांचा समर्थकवर्ग लक्षणीय प्रमाणात आहे.

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

देशाचा विकास दर ७.८ टक्के; नवीन व्याख्येनुसार आकडेवारी जाहीर; वार्षिक अंदाज ७.६ टक्के

नगरपरिषदेच्या अध्यक्षांनाही नगरसेवकपद मिळणार; परवानगी देणारे विधेयक विधिमंडळात मंजूर

अखेर देवेंद्र सिंग यांचे निलंबन; पंकजा मुंडेंशी वाद नडला; अधिवेशन काळात कारवाई

Mumbai : ४७ वर्षे भाडे थकवणाऱ्या भाडेकरूला दणका; बँक ऑफ इंडियाची नोटीस योग्य, हायकोर्टाचा निर्णय