टाटा सन्सकडून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल 
राष्ट्रीय

टाटा सन्सकडून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

टाटा ट्रस्टच्या दोन संस्थांनी अपील दाखल केल्यास आपली बाजू ऐकून घेतली जावी, यासाठी टाटा सन्सने शनिवारी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि आरडी टाटा ट्रस्ट यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.

Swapnil S

मुंबई : टाटा ट्रस्टच्या दोन संस्थांनी अपील दाखल केल्यास आपली बाजू ऐकून घेतली जावी, यासाठी टाटा सन्सने शनिवारी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि आरडी टाटा ट्रस्ट यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.

३० नोव्हेंबर रोजी होणारी टाटा सन्सची संचालक मंडळाची बैठक स्थगित करण्याचा किंवा त्यावर स्थगिती देण्याचा आदेश न्यायालयाने दिला नाही. तसेच अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना निर्णायक मताचा (कास्टिंग व्होट) वापर करण्यापासून रोखण्याची मागणीही मान्य झाली नाही.

न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने टाटा सन्स आणि अन्य प्रतिवादींना २६ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या दोन याचिकांवर उत्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी १८ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. दोन्ही ट्रस्टनी चंद्रशेखरन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदावरील तिसऱ्या पाच वर्षांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टने ५० कोटी रुपये, तर आरडी टाटा ट्रस्टने १५ कोटी रुपये नुकसानभरपाई आणि त्यावर वार्षिक १८ टक्के व्याजाची मागणी केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे

Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

Mumbai : पालिकेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सल्लागारांची फौज; पुनर्बांधणी, ऑडिटसाठी ८५ सल्लागारांची नियुक्ती

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध