चंद्रा यांची पुन्हा निवड, ‘टाटा’मध्ये नवा वाद (Photo - PTI)
राष्ट्रीय

चंद्रा यांची पुन्हा निवड, ‘टाटा’मध्ये नवा वाद

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने गुरुवारी एन. चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.

Swapnil S

मुंबई : टाटा सन्सच्या संचालक मंडळाने गुरुवारी एन. चंद्रशेखरन यांची पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. मात्र, समूहाची मुख्य भागधारक असलेल्या 'टाटा ट्रस्ट्स'ने हा ठराव तत्काळ अवैध ठरवला असून, यामुळे टाटा समूहातील अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्ववाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संचालक मंडळाच्या सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत या नाट्यमय घडामोडी घडल्या.

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीबाबत संचालक मंडळात एकमत होत नसल्यामुळे, २० फेब्रुवारी २०२७ रोजी सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदावर न राहण्याची इच्छा त्यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सला शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापासून सूट देण्याची मागणी फेटाळल्यानंतर, संचालक मंडळाने पुन्हा चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

टाटा सन्सचे अधिकृत निवेदन

संचालक मंडळाच्या आग्रही विनंतीचा मान राखून चंद्रा यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला. त्यानंतर संचालक मंडळाने बहुमताने त्यांची पुढील ५ वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केला, असे टाटा सन्सने स्पष्ट केले. टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केले. मात्र, बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्यात आला, ज्यावर आता ट्रस्ट्सने आक्षेप घेतला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mira-Bhayandar : मेहतांच्या कंपनीची बांधकाम परवानगी रद्द; अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार याची चर्चा

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर

Mumbai : मंत्रालयीन पतसंस्थेत १ कोटी ६६ लाखांचा अपहार; माजी अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल