राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमधील 'तेहरिक-ए-हुर्रियत'वर UAPA अंतर्गत कारवाई; अमित शाह म्हणाले, "कोणत्याही व्यक्ती किंवा..."

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम) वर पाच वर्ष बंदी घातली होती. ही कारवाई देखील देशविरोधी कारवाया केल्याने UAPA अंतर्गत केली गेली होती.

Rakesh Mali

'मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर'(मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने 'तेहरीक-ए-हुर्रियत'वर देखील बंदी घातली आहे. दहशतवादी कारवायांमुळे UAPA अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर दिली.

'तेहरीक-ए-हुर्रियत' ही संघटना जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी अवैध कारवाया करत होती. हा गट जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढवण्यासाठी भारतविरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया करत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरोधी झीरो टॉलरन्स पॉलिसीअंतर्गत भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघनेचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असे अमित शाह यांनी या कारवाईबाबत माहिती देताना सांगितले.

यापूर्वी देखील केली कारवाई

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम) वर पाच वर्ष बंदी घातली होती. ही कारवाई देखील देशविरोधी कारवाया केल्याने UAPA अंतर्गत केली गेली होती.

केंद्र सरकार, अनलॉफुल अॅक्टिव्हीटीज प्रिव्हेशन अॅक्ट(UAPA) अंतर्गत कोणत्याही संघटनेवर बेकायदा किंवा दहशतवादी घोषित करुन बंदी घालू शकते. केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्या देशभरातील 43 संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करुन त्यांच्यावर बंदी घातली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी