राष्ट्रीय

Telangana CM: अखेर ठरलं! रेवंत रेड्डीच होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 'या' तारखेला होणार शपथविधी

काँग्रेसचे केसी वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

नवशक्ती Web Desk

नुकत्याच लागेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निकालत तेलंगणात काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. निकालानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. विजयात सिंहाचा वाटा असणारे रेवंत रेड्डी हेच तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असल्याचं सांगितलं जात होतं. यावर आता काँग्रेस हायकमांडने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे केसी वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाच्या उमेदारावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काँग्रेसला तेलंगणात ऐतिहासिक विजय मिळवून देणारे रेवंत रेड्डी हेच तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. येत्या ७ डिसेंबर रोजी रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केसी वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले, रेवंत रेड्डी हे अनुभवी आहेत. लोकांसोबत काम केलं आहे. याच बरोबर त्यांनी तेलंगणाच्या लोकांना आश्वासनं दिली आहेत. रेवंत रेड्डी यांना काँग्रेस तेलंगणाचे मुख्यमंत्री घोषीत करत आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिंकवण्यासाठी घेतलेली रेवंत रेड्डी यांची मेहनत फळाला आली आहे. पक्षाने देखील त्यांच्या कामगिरीचा मोबदला त्यांना दिला आहे. ११९ विधानसभा मतदार संघ असलेल्या तेलंगणात ६४ जागावर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर स्पर्धेत असलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाला ३९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपला मात्र तेलंगणात अवघ्या ८ जागा मिळवता आल्या आहेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला