संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये लष्करी वाहनावर हल्ला; तीन जवान शहीद, दोन मजुरांचाही मृत्यू, २ जवान जखमी

लष्कराची गाडी नियंत्रणरेषेकडे निघालेली असताना दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

Swapnil S

गुलमर्ग : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे गुरुवारी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले असून, दोन मजूर मृत्यू पावले आहेत. तसेच २ जवान जखमी झाले आहेत.

गुलमर्ग येथील बोटापथरी भागातील नागिन येथे ही घटना घडली. लष्कराची गाडी नियंत्रणरेषेकडे निघालेली असताना दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ही गाडी राष्ट्रीय रायफल्सची होती. या गोळीबारात तीन जवान शहीद, दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जवान जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. २० ऑक्टोबरला गंदरबल येथे दहशतवाद्यांनी ७ जणांची हत्या केली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. विशेष म्हणजे बिगरकाश्मिरींना वेचून मारले जात आहे.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद