राष्ट्रीय

सरकार ४ लाख टन तूरडाळ आयात करणार

तुरीचे दर कमी होण्यासाठी सरकारने आफ्रिका व म्यानमारमधून डाळ आयात करण्याचे ठरवले आहे.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : तुरडाळीचे दर देशात २०० रुपये किलोच्या वर गेल्याने सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. त्यातच निवडणुका जवळ आल्याने सरकारने तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४ लाख टन तूरडाळ जानेवारीत, तर १० लाख टन उडीद डाळ फेब्रुवारीत मान्यमारमधून आयात करणार आहे, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबरमध्ये तूरडाळीचे दर (४०.९४ टक्के), मूगडाळीचे दर (१२.७५ टक्के), चणाडाळीचे (११.१६ टक्के) दर वाढले आहेत, तर डाळींची किरकोळ महागाई १८.७९ टक्क्याने वाढली. तुरीचा महागाईवाढीचा दर ३७.३ टक्के आहे. तुरीचे दर कमी होण्यासाठी सरकारने आफ्रिका व म्यानमारमधून डाळ आयात करण्याचे ठरवले आहे.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

Mumbai : नदीनाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी कारवाई; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इशारा, CCTV ची नजर

आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!

Mumbai : मानखुर्द-सायन पनवेल उड्डाणपुलाला टॉवरचा अडथळा; १३ टॉवरची उंची ३१ मीटरने वाढवणार

१० विश्लेषकांची SEBI कडून नोंदणी रद्द; नूतनीकरण शुल्क न भरल्यामुळे कारवाई