राष्ट्रीय

महिला विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी महिलांसाठी ३३ टक्के मतदारसंघ आरक्षित होणार

मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयकाला नारीशक्ती वंदन विधेयक असे म्हटले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर झालेले ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक आता कायदा बनला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने त्याचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. यानंतर केंद्र सरकारने राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे. यामुळे लोकसभा, विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.

मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयकाला नारीशक्ती वंदन विधेयक असे म्हटले आहे. लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. आता तो कायदा बनला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन