राष्ट्रीय

१७ भारतीय ओलीस, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

Swapnil S

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने इस्रायल-संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतले असून त्यावर १७ भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सातत्याने इराणच्या संपर्कात आहे.

राजनैतिक मार्गाने तेहरान आणि दिल्लीत इराणच्या अधिकाऱ्यांशी भारत संपर्क ठेवून आहे, त्यांची लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले असल्याची आम्हाला कल्पना आहे, त्या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सदर मालवाहू जहाज होर्मूजच्या सामुद्रधुनीतून जात असताना इराणच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने शनिवारी सकाळी ते ताब्यात घेतले. जहाजावरील १७ भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने इराणच्या संपर्कात आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग