राष्ट्रीय

थिरूअनंतपुरम मनपात भाजप विजयी

केरळची राजधानी थिरूअनंतपुरम मनपावर भाजपने विजय मिळवला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ही मनपा सीपीआय (एम) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएलच्या ताब्यात होती. या विजयामुळे पुढील वर्षी केरळातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठे संकेत मिळत आहेत.

Swapnil S

थिरूअनंतपुरम : केरळची राजधानी थिरूअनंतपुरम मनपावर भाजपने विजय मिळवला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ही मनपा सीपीआय (एम) यांच्या नेतृत्वाखालील एलडीएलच्या ताब्यात होती. या विजयामुळे पुढील वर्षी केरळातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठे संकेत मिळत आहेत.

थिरूअनंतपुरम मनपाच्या १०१ प्रभागापैकी ५० जागांवर भाजपने विजय मिळवला. तर एलडीएफला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला केवळ १९ जागी विजय मिळाला. दोन अपक्ष उमेदवारही विजय झाले आहेत.

पलक्कड नगरपालिकेत रालोआने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या नगर पालिकेत यूडीएफचा पराभव केला. त्रिशूरमध्ये भाजप कोडुंगल्लूर नगर पालिकेतील ४६ पैकी १८, त्रिशूर मनपात ८, गुरुवयूर आणि वडक्कनचेरी नगर पालिकेत दोन-दोन, कुन्नमकुलम नगर पालिकेत ७, इरिंजलाकुडा नगर पालिकेत ६ आणि चलाकुडी नगर मनपात एक जागा जिंकली आहे.

केरळ राज्य निवडणूक आयोगाच्या दुपारच्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीने केरळात १०८५ ग्रामपंचायत प्रभाग, ४४ पंचायत समिती प्रभाग जिंकले आहेत.

थिरूअनंतपुरम मनपाच्या निवडणुकीत एलडीएफच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार उघड करण्याचे काम भाजपने केले होते. त्यामुळे मतदारांनी भाजपला मते देऊन विजयी केले.

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा! श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा