PM
राष्ट्रीय

ही तर नमोशाही... -जयराम रमेश यांची टीका

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन संसदेत कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेशिवाय कठोर विधेयके मंजूर करण्यासाठी संपूर्ण शुद्धीकरण केले जात आहे, असा टोला हाणत काँग्रेसने मंगळवारी सर्व जुलमी कारभाराला ‘नमोशाही’ असे संबोधले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन घुसखोरांच्या प्रवेशाची सोय करणारे भाजप खासदार मुक्त व्हावेत यासाठी हे केले जात आहे.

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी हा टीकेचा भडिमार सुरू केला. 

जयराम रमेश यांनी मंगळवारी दावा केला की, कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेविना कठोर विधेयके मंजूर केली जावीत यासाठी हे संपूर्ण निर्मूलन केले गेले आहे आणि त्यामुळे दोन घुसखोरांना लोकसभेत प्रवेश करण्याची सुविधा देणारे 'ते' भाजप खासदार मुक्त राहिले आहेत. एक प्रकारे नव्या संसदेत सर्व जुलमी राजवटीतील 'नमोक्रसी' स्पष्ट होत आहे, असेही जयराम रमेश यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत