राष्ट्रीय

उष्णतेमुळे दूध दरवाढीची शक्यता

Swapnil S

नवी दिल्ली : नेहमी उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटत असते. कारण यंदा उष्णतेच्या लाटा अधिक दिवस राहणार असल्याने दुधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटा येणार असल्याने आणि पाणी सुकल्याने दूध देणाऱ्या पशूंसाठी पाणी व चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुधाचे उत्पादन घटल्याने दूध दरवाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील १५० जलायशांत पाण्याची पातळी ३५ टक्के आहे. ही पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ टक्के कमी, तर १० वर्षांच्या सरासरीपेक्षा दोन टक्के कमी आहे. एका व्यापाऱ्याने सांगितले की, ६.५ टक्के फॅट असलेल्या दुधाचा दर ४७-४८ रुपये प्रति लिटर आहे. गेल्यावर्षी हाच दर ५७-५८ रुपये होता. केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाच्या आकडेवारीनुसार, दुधाची सरासरी किंमत ५७.६ रुपये प्रति लिटर आहे. गेल्यावर्षी ती ५६ रुपये होती.

२०२३-२४ मध्ये देशाचे दूध उत्पादन २४ ते २५ कोटी टन होते. २०२२-२३ पेक्षा हे उत्पादन ४.५ टक्क्याने अधिक आहे. भारत हा दुधाच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण, प्रति व्यक्ती दुधाचा खप खूप कमी आहे. भारतात प्रति व्यक्ती दुधाचा वार्षिक खप ८४ किलो आहे, तर फिनलँडला हाच खप ४३० किलो आहे.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. विशेषत: महाराष्ट्र, ओदिशा व दक्षिणेतील राज्यांत कडक उन्हाळा असू शकतो. जलाशयात पाण्याची पातळी कमी होणार असल्याने देशात पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळे पशूंना पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे पहिल्या तिमाहीत दुधाचे उत्पादन घटू शकते. यंदा मान्सून चांगला राहणार असल्याने त्याची भरपाई होऊ शकते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त