एक्स @naveendhimanin
राष्ट्रीय

पोरबंदरला तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून तीन ठार

गुजरातमधील पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन जण ठार झाले.

Swapnil S

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर येथे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन जण ठार झाले.

भारतीय तटरक्षक दलाचे हलके हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ नियमित सराव उड्डाणानंतर तटरक्षक दलाच्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर हेलिकॉप्टरला लागलेली आग अग्निशमन दलाने विझवली. अपघातात हेलिकॉप्टरमधील तीन जण गंभीर भाजले, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिघांचाही मृत्यू झाला.

कमांडंट (जेजी) सौरभ, डेप्युटी कमांडंट एस. के. यादव, नाविक मनोज प्रधान अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी भारतीय तटरक्षक दलाचेच ‘एएलएच एमके-तीन’ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यावेळीही तीन कर्मचारी मरण पावले होते.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा